• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो गॅस सिलेंडरच्या रोजच्या वितरणात वाढ

एलपीजी गॅसचा अतिरिक्त साठा वाढविण्याबाबत कंपन्यांना निर्देश

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

नागपूर,दि.21 : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी गॅस वितरक कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्याबाबत आढावा घेतला जात आहे. जे ग्राहक प्रामाणिकपणे आपल्या मोबाईलद्वारे गॅस कंपनीच्या ॲपवर नोंदणी करत आहेत अशा ग्राहकांना कोणत्याही स्थितीत निर्धारीत कालावधीत घरपोच सिलेंडर एजन्सीने पाठविणे क्रमप्राप्त आहे. ज्या ग्राहकांनी ई-केवायसी अद्याप केली नाही त्यांना जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ही ई-केवायसी मोफत करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्ह्यातील सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्याकरीता गॅस एजन्सी चालक व गॅस वितरक कंपन्या यांच्या संयुक्त आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस जिल्हा वितरण अधिकारी विनोद काळे व गॅस कंपन्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या नव्या नियमानुसार वितरणातील दोष दूर करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारा OTP दिल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही. ज्या ग्राहकांनी आपली ई-केवायसी केली नाही त्यांच्यापर्यंत नागपूर शहर व जिल्ह्यात गॅस वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी बाबत निर्णय घेतला.

जिल्ह्यात स्थलांतरित कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलो गॅस सिलेंडरच्या वितरण प्रमाणात वाढ करण्यात येत असून, ही मात्रा विद्यमान सरासरी पुरवठ्याच्या तुलनेत दुप्पट करण्यात येत आहे. ही वाढ दिनांक ३ मार्च पर्यंतच्या पुरवठ्याच्या आधारावर करण्यात येईल. सदर सिलेंडरचा वापर फक्त स्थलांतरित कामगारांना पुरवठा करण्यासाठी करण्यात यावा असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट करुन जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले.

जिल्ह्यातील एलपीजी सिलेंडरच्या वितरणात काही ठिकाणी वाढती मागणी, तांत्रिक अडचणी तसेच घाऊक गर्दी यामुळे पुरवठा प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना तत्काळ व पारदर्शक पद्धतीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी कॅश अँड कॅरी काऊंटर सुरू करण्याचे याचबरोबर एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल कंपनीच्या संबंधीत अधिकाऱ्यांना 90 टक्के डीएसी करण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी निर्देश त्यांनी दिले.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त

Next Post

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In