• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; मंत्रालयातील कामकाज ठप्प, नागरिकांना मोठा फटका
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. राज्याच्या प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालय येथेही या संपाचा मोठा परिणाम जाणवला. संपाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयातील सुमारे निम्मे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने कामकाज ठप्प झाले असून, विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संप सुरू होऊनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नसल्याने हा संप पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याने कामकाजाची गती मंदावली आहे. मंगळवारी मंत्रालयातील एकूण ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३ हजार ६१९ कर्मचारी उपस्थित असल्याची नोंद करण्यात आली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या संपाचा विशेषतः महसूल, सामान्य प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांवर मोठा परिणाम झाला आहे. मंगळवार हा मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस असल्याने राज्यभरातून अनेक नागरिक मंत्रालयात आपल्या कामांसाठी दाखल झाले होते. मात्र, कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे तासन्-तास प्रतीक्षा करूनही अनेकांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.

संपामुळे शासकीय सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांची प्रलंबित कामे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

घरगुती सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेतु सुविधा केंद्रात ई-केवायसी मोफत

Next Post

मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न

मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In