• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
मौजे भिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

पुरंदर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मौजे भिवरी येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “एकच साहेब बाबासाहेब” आणि “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

दि. १४ एप्रिल रोजी ग्रामदैवताच्या यात्रेमुळे सामाजिक सलोखा जपत जयंती पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर अखिल पंचशील तरुण मंडळाच्या वतीने सासवड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते भिवरी येथील बौद्ध विहार असा पायी ज्योत आणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

शनिवार दि. १८ एप्रिल रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात सरपंच मोनाली कटके यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी त्रिशरण पंचशील व धम्म वंदना घेण्यात आली. राहुल कटके, प्रकाश कटके, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महापुरुषांच्या प्रतिमांची आकर्षक सजावट करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि भीमगीतांच्या तालावर जयघोष करत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अन्नदान करून जयंतीची सांगता करण्यात आली.

या जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल पंचशील मित्र मंडळाचे अनिल गायकवाड, अध्यक्ष श्रीधर गायकवाड, कैलास गायकवाड, विठ्ठल गायकवाड, केरबा शेलार, मेघराज शेलार तसेच इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता

Next Post

कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न

कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In