• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या – संजय पाटील यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या – संजय पाटील यांची मागणी
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

आजरा, प्रतिनिधी:
आजरा साखर कारखान्याकडून सध्या १६ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत सवलतीच्या दरात साखर वितरण सुरू आहे. मात्र या वितरण धोरणात काही सभासद वंचित राहत असल्याचा आरोप करत सर्व सभासदांना सरसकट साखर द्यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय पाटील यांनी केली आहे.

सध्या कारखान्याकडून १५,००० रुपये शेअर्स असलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्ग सभासदांना ५० किलो, १०,००० रुपये शेअर्स असलेल्यांना २५ किलो, तर ७,००० रुपये शेअर्स असलेल्यांना १५ किलो साखर सवलतीच्या दरात दिली जात आहे. तसेच गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर २५ रुपये दराने दिली जात आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

परंतु ५,००० ते ६,००० शेअर्स रक्कम असलेल्या अनेक सभासदांना या योजनेतून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात आजरा येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनानुसार, ५ ते ६ हजार शेअर्स असलेले सुमारे १७,४०८ सभासद, ५ हजारांखालील ६,५८१ सभासद आणि ६ ते ७ हजार शेअर्स असलेले १,३४४ सभासद असे एकूण २५,३३८ सभासद साखर वितरणातून वंचित राहत आहेत. हे सर्व सभासद कारखान्याच्या स्थापनेपासून जोडलेले असून, ऊस पुरवठा आणि मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

“जे सभासद कारखान्याच्या सर्व प्रक्रियेत सहभागी होतात, त्यांनाच सवलतीच्या साखरेपासून दूर ठेवणे योग्य नाही. सर्व सभासदांसाठी एकसमान धोरण राबवून किमान ५० किलो साखर सरसकट सवलतीच्या दरात द्यावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

तसेच, मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तसेच कायदेशीर पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन साखर संचालक, कोल्हापूर तसेच पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनाही देण्यात आले आहे.

यावेळी संजय पाटील, राजेंद्र सावंत, काकासो देसाई, संतोष भाटले (कार्यालय प्रमुख), दयानंद निऊंगरे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा हायस्कूलतर्फे प्रा. ज्योती कुंभार व विद्यार्थिनी वैष्णवी भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

देवधरी फाटा–देहगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ संतप्त; चौकशीची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
देवधरी फाटा–देहगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ संतप्त; चौकशीची मागणी

देवधरी फाटा–देहगाव रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थ संतप्त; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In