• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया” – डॉ. आनंद महाराज गोसावी; आजऱ्यात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
“देव ओळखण्याची पात्रता धर्म संस्कारांतून निर्माण करूया” – डॉ. आनंद महाराज गोसावी; आजऱ्यात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
“अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥” या मंत्रघोषात ब्राह्मण सभा आजरा यांच्या वतीने भगवान परशुराम जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी चैतन्य हॉल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला हत्तरगी मठाचे मठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या षोडशोपचार पूजनाने झाली. यंदा अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच शिवजयंतीचे औचित्य असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले, तसेच समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

संस्कारांची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी सामूहिक हनुमान चालीसा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. आपल्या आशिर्वचनात डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी “देव ओळखण्याची पात्रता ही धर्म संस्कारांतूनच निर्माण होते,” असे सांगत धर्माचरण व आदर्श जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी समाजातील वाढती जागरूकता पाहून समाधान व्यक्त केले व सर्वांना आशिर्वाद दिला.

कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच ब्राह्मण सभेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. माजी अध्यक्ष जयवंत केळकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर आपटे यांनी केले. शेवटी महिलांच्या हळदीकुंकू समारंभानंतर सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“ढोराळा शिवारात गारपीटीचा तडाखा; द्राक्ष, आंबा पिकांसह सौर प्लेटांचे मोठे नुकसान”

Next Post

“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
87
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”

“कलेमुळे जीवन समृद्ध होते – प्रा. विक्रम बोकडे; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात”

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In