
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | पिंपोडे बुद्रुक | प्रतिनिधी
पिंपोडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटी (सोसायटी क्र. १) च्या उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदावर राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सत्तेचे संतुलन राखण्यासाठी आणि सर्व संचालकांना संधी मिळावी या उद्देशाने वरिष्ठ नेतृत्वाने उपाध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता सहाय्यक निबंधक, कोरेगाव अभिमान थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन छगन साळुंखे तसेच संचालक जनार्दन निकम, सूर्यकांत निकम, रमेश लेंभे, महेश गार्डी, बाजीराव लेंभे, राकेश निकम आदी उपस्थित होते.
निवडीनंतर कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय (नाना) साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य विकास साळुंखे, माजी चेअरमन राकेश निकम, माजी चेअरमन बाजीराव लेंभे, महेश गार्डी, संजय लेंभे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार नितीन (काका) पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच माजी आमदार दीपक चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

