• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in Blog
0
जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जालना (प्रतिनिधी) – शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कायद्याचे भक्कम ज्ञान मिळावे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी राहावी, या उद्देशाने जालना येथे विशेष एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जालना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या शिबिरात ‘संवाद मेळावा’ आणि ‘प्रशिक्षण’ या दुहेरी संकल्पनेतून नगरसेवकांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण, तसेच गुन्हेगारीविरोधात तत्पर भूमिका घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती या माध्यमातून देण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटन मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक बन्सल होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, प्रभारी उपअधीक्षक रायततुवार, अशोक पांगारकर, कमलेश खरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरामध्ये विविध कायदे, नागरिकांशी संवाद साधण्याची पद्धत, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी समन्वय कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे नगरसेवकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात उपयोगी पडणारे व्यावहारिक ज्ञान मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

दरम्यान, या प्रशिक्षण शिबिराबाबत संध्याताई देठे यांनी समाधान व्यक्त करत, “अशा उपक्रमांमुळे लोकप्रतिनिधींना कायद्याचे योग्य भान मिळून नागरिकांची सेवा अधिक प्रभावीपणे करता येईल,” असे सांगितले.

या उपक्रमामुळे जालना शहरात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय अधिक बळकट होऊन गुन्हेगारीविरोधात ठोस पावले उचलण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का

Next Post

‘लेक लाडकी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जालन्यात ५,३१२ मुलींना लाभ

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

‘लेक लाडकी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जालन्यात ५,३१२ मुलींना लाभ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In