• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘लेक लाडकी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जालन्यात ५,३१२ मुलींना लाभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जालना, दि.२४ (जिमाका) – जिल्ह्यात बालिकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ५ हजार ३१२ मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास अधिकारी सौ. कोमल कोरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेमार्फत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, बालविवाहाला आळा घालणे आणि मुलींच्या शिक्षणाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सातवीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये, तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेमुळे जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यास मदत होत असून, त्यांच्या शिक्षणाबाबत कुटुंबांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत आहे. ‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक मदत न राहता समाजातील मुलींबाबतचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचेही कोरे यांनी नमूद केले. मुलगी ही कुटुंबाची ‘लाडकी’ बनत असल्याचे चित्र या योजनेमुळे अधिक ठळकपणे दिसून येत आहे.

Previous Post

जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल

Next Post

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In