• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
हद्दपार आदेशावर विभागीय आयुक्तांची स्थगिती; १०-१५ दिवसांत पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाला धक्का
0
SHARES
72
VIEWS
Ad 1

अक्राणी (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिस अधीक्षकांनी केलेल्या हद्दपार आदेशाला विभागीय आयुक्तांनी अवघ्या १०-१५ दिवसांत स्थगिती देत मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, भारतीय स्वाभीमानी संघाचे राज्य सचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुसळदे आणि विधीतज्ञ वकील राहुल कुवर अशा नऊ जणांना पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी २५ मार्च २०२६ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला होता.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या आदेशाविरोधात वकील राहुल कुवर यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. त्यासोबत स्थगिती अर्जही सादर करण्यात आला होता. या अपीलची सुनावणी करताना विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी संबंधितांवर दाखल गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे असून गंभीर स्वरूपाचे नसल्याचे निरीक्षण नोंदवत ६ एप्रिल २०२६ रोजी हद्दपार आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर १३ एप्रिल रोजी इतर काही कार्यकर्त्यांनाही दिलासा देण्यात आला.

या निर्णयामुळे पोलिस अधीक्षकांच्या कारवाईवर तीव्र टीका होत असून, ही कारवाई राजकीय दबावातून झाली असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन केले होते.

बिरसा आर्मी, बिरसा फायटर्स, आदिवासी युवा सेना आणि इतर संघटनांनीही या कारवाईविरोधात निवेदने देत निषेध व्यक्त केला आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्णयामुळे संबंधित कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

परतूर मध्ये भीषण आग; वडील मुलाचा मृत्यू, आमदार बबनराव लोणीकर यांचा तातडीने मदतीसाठी पुढाकार

Next Post

जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल

जालन्यात नगरसेवकांसाठी विशेष कायदेविषयक प्रशिक्षण; गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In