• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) : शहादा शहरातील खेतिया रोड चार रस्ता परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाज बांधवांनी दुकानांची जागा वाढवून देण्याची मागणी करत उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांना निवेदन सादर केले.

गेल्या सुमारे ५० वर्षांपासून या परिसरात चर्मकार समाजाचे बांधव बूट-चप्पल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांची दुकाने केवळ ४x४ फुटांच्या जागेत असून ती व्यवसायासाठी अपुरी ठरत आहेत. यामुळे व्यावसायिकांना साहित्य ठेवताना तसेच ग्राहकांना सेवा देताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दुकानांची जागा कमी असल्याने ग्राहकांना रस्त्यावर उभे राहून सेवा घ्यावी लागते. त्यामुळे उन्हापावसाचा त्रास होण्यासोबतच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी दुकानांच्या मागील बाजूस असलेल्या पालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेतून किमान ५ फूट जागा वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यावसायिकांनी स्पष्ट केले की, संबंधित ठिकाणी कोणतेही पक्के बांधकाम नसल्याने जागा वाढवून दिल्यास पालिकेचे नुकसान होणार नाही. उलट, वाढीव जागेसाठी नियमांनुसार अतिरिक्त कर भरण्यास ते तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होईल आणि शहराचे सौंदर्यही अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे निवेदन चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हिरालाल सोमा अहिरे, सचिव तुकाराम गबा अहिरे यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.

दरम्यान, उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

“चला गाव पाणीदार बनवूया…!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग

Next Post

जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र

जेईई मुख्य परीक्षेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे घवघवीत यश; दोन विद्यार्थी ‘ॲडव्हान्स’साठी पात्र

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In