• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“चला गाव पाणीदार बनवूया…!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
“चला गाव पाणीदार बनवूया…!” नंदुरबार जिल्ह्यात गाळमुक्त धरण व नाला खोलीकरण मोहिमेला वेग
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” तसेच नाला खोलीकरण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. विविध धरणे, तलाव आणि नाल्यांमधील साचलेला गाळ काढून जलसाठ्यांची क्षमता वाढविण्याचा व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत भारतीय जैन संघटना (BJS) च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३३ जलसाठ्यांमधून सुमारे १०.३० लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यासाठी सुमारे ६३६.६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांतील विविध लघुपाटबंधारे, पाझर तलाव व गाव तलावांमध्ये गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील ५१ नाल्यांच्या खोलीकरणालाही मंजुरी देण्यात आली असून या कामांतून सुमारे ८.३२ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी २९८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे पावसाळ्यात पाणीसाठा वाढून तो अधिक काळ टिकून राहणार आहे. तलाव व नाल्यांमधून काढलेला सुपीक गाळ शेतात टाकल्याने जमिनीची उर्वराशक्ती वाढून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक, विधवा, अपंग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत असून गाळ वाहतुकीसाठी प्रति एकर १५ हजार रुपये, कमाल ३७,५०० रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच व लोकप्रतिनिधींनी या कामांवर लक्ष ठेवून पारदर्शक अंमलबजावणी करावी तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेत अंतिम अहवाल मंजूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन BJS चे डॉ. कांतीलाल टाटीया यांनी केले आहे. या मोहिमेमुळे जलसंधारणाला चालना मिळून शेतीला बळ मिळेल आणि “चला गाव पाणीदार बनवूया” हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

मंत्रालयात ‘कन्टेन्ट रायटर’ म्हणून नुपूर पाटीलची निवड; शहाद्याचा अभिमान

Next Post

चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन

चर्मकार समाजाची मागणी; दुकानांची जागा वाढवून देण्यासाठी उपनगराध्यक्षांना निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In