• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 28, 2026
in Blog
0
पनवेलमध्ये काँग्रेसचे धीरेंद्र शास्त्रींविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन; शिवरायांच्या अपमानाचा तीव्र निषेध
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी:
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पनवेल आणि नवी मुंबईत उमटले आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात आक्रमक ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

नागपूर येथील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीचे भाष्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, महाराजांचा अपमान करणाऱ्या शास्त्रींनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांचा तीव्र निषेध केला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “धीरेंद्र शास्त्रींचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या प्रकरणी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यास बंदी घालावी, अशी आक्रमक मागणी पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.

ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे भाजपचे नेते उपस्थित असूनही त्यांनी विरोध केला नाही, असा आरोप करत काँग्रेसने सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. अशा चुकीच्या विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून, महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केनी, कुसुम म्हात्रे,श्रुती शाम म्हात्रे,शशिकला सिंह यांच्या सह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

माळीवाडा येथे भक्तिमय वातावरणात काल्याचे कीर्तन; आमदार संजना जाधव यांनी घेतले दर्शन

Next Post

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
33
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी

पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती विशेष सभेत विविध विषयांना मंजूरी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In