• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुक्याचे लोकनेते जयवंतराव शिंपी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; संघर्षातून उभे राहिलेले उत्तुंग नेतृत्व

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा तालुक्याचे लोकनेते जयवंतराव शिंपी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; संघर्षातून उभे राहिलेले उत्तुंग नेतृत्व
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) :
समाजकारण, राजकारण, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. जयवंतराव शिंपी (साहेब) यांनी ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. १ मे या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ व प्रेरणादायी कार्याचा आढावा घेण्यात येत आहे.

शून्यातून उभा राहिलेला प्रवास :
१ मे १९५१ रोजी आजरा येथे त्यांचा जन्म झाला. वडील गुडोपंत शिंपी यांचा तांदूळ व लाकडाचा व्यवसाय होता. मात्र, लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर संघर्षाची वेळ आली. मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वाचनाची आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वैचारिक जडणघडण घडवली.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास :
१९८४ साली ग्रामपंचायत निवडणुकीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९९२ मध्ये ते आजरा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी त्यांना जिल्हा परिषदेवर संधी दिली.
१९९८ मध्ये ते जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती व पक्षप्रतोद झाले, तर २०१६ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

दूरदृष्टीचे निर्णय :
जयवंतराव शिंपी यांनी घेतलेले काही निर्णय राज्यासाठी मार्गदर्शक ठरले. सरपंच असताना ‘चौरस फुटा’नुसार घरफाळा आकारणीचे धोरण त्यांनी राबवले, जे पुढे राज्यभर स्वीकारले गेले. तसेच, आजरा साखर कारखाना अडचणीत असताना तो खासगी तत्त्वावर चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला टीका झाली असली तरी हा प्रयोग यशस्वी ठरला. २००१ मध्ये त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही प्रभावी नेतृत्व केले.

शिक्षण व सामाजिक कार्य :
सध्या ते आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. शेतीसाठी पाणी योजना, ऊस उत्पादन वाढविणे यांसारख्या उपक्रमांतही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.

७५ व्या वर्षात पदार्पण करतानाही त्यांचा उत्साह आणि कार्यतत्परता कायम असून, “सामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता” अशी त्यांची ओळख आजरा तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव

Next Post

आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे सर सेवानिवृत्त; सैनिक स्कूलमध्ये भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
32
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
67
Next Post
आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे सर सेवानिवृत्त; सैनिक स्कूलमध्ये भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ

आंबोली केंद्राचे केंद्रप्रमुख आर. बी. गावडे सर सेवानिवृत्त; सैनिक स्कूलमध्ये भावपूर्ण सत्कार व निरोप समारंभ

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In