• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 1, 2026
in Blog
0
आजरा तालुका क्षयरोग मुक्तीकडे; ३७ ग्रामपंचायतींचा ‘महात्मा गांधी’ पुतळा व प्रमाणपत्र देऊन गौरव
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) :
आरोग्य विभाग, पंचायत समिती आजरा यांच्या वतीने ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियान कार्यशाळा तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘टी.बी. मुक्त भारत’ अभियानात उल्लेखनीय यश मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम तहसीलदार कार्यालय, आजरा येथील सभागृहात संपन्न झाला असून, अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे होत्या.

यावेळी मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाची सविस्तर माहिती दिली. हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असून, कुटुंब नियोजन, आरोग्य विषयक निकष आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

३७ ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण :
आजरा तालुक्यातील एकूण ३७ ग्रामपंचायतींनी क्षयरोग निर्मूलनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ‘महात्मा गांधी’ यांचा पुतळा देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये –
सुवर्ण पुरस्कार : ०४ ग्रामपंचायती
रौप्य पुरस्कार : १५ ग्रामपंचायती
कांस्य पुरस्कार : १८ ग्रामपंचायती

मान्यवरांची उपस्थिती :
कार्यक्रमास उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारधे, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत बी.एन.ओ. श्रीमती मनीषा भांडकोळी यांनी केले. डॉ. रवींद्र गुरव यांनी प्रास्ताविकातून अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर शेवटी आरोग्य सेवक कौस्तुभ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

या सोहळ्यास तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आजरा हायस्कूलचे शिक्षक जी. डी. कांबळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६’ जाहीर

Next Post

आजरा तालुक्याचे लोकनेते जयवंतराव शिंपी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; संघर्षातून उभे राहिलेले उत्तुंग नेतृत्व

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
4
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post
आजरा तालुक्याचे लोकनेते जयवंतराव शिंपी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; संघर्षातून उभे राहिलेले उत्तुंग नेतृत्व

आजरा तालुक्याचे लोकनेते जयवंतराव शिंपी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण; संघर्षातून उभे राहिलेले उत्तुंग नेतृत्व

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In