• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलला शिक्षण विभागाचा दणका; मान्यता रद्द करण्याचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलला शिक्षण विभागाचा दणका; मान्यता रद्द करण्याचा इशारा
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा, दि. ०२ (प्रतिनिधी) – शहादा येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली असून शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर वर्ग संचालन आणि विद्यार्थ्यांच्या छळासारख्या गंभीर आरोपांची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी १५ एप्रिल रोजी शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीत २२ एप्रिल रोजी अनेक गंभीर अनियमितता उघड झाल्या.

RelatedPosts

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

चौकशीत आढळलेल्या मुख्य बाबी अशा –

  • आयसीएसई मंडळाची अधिकृत मान्यता नसताना अभ्यासक्रम सुरू
  • पालकांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके व गणवेश खरेदीसाठी दबाव
  • ११० शिक्षकांपैकी ६१ शिक्षकांकडे व्यावसायिक पात्रता नाही, तर ४९ शिक्षक शैक्षणिकदृष्ट्या अपात्र
  • विद्यार्थी सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा (CCTV, सखी सावित्री समिती, तक्रार पेटी) अनुपस्थित
  • राष्ट्रगीत व राज्यगीताबाबत नियमांचे उल्लंघन
  • पालक-शिक्षक संघाच्या संमतीशिवाय १५% फी वाढ

याशिवाय, फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केल्याच्या तक्रारी असून, इयत्ता ७ वीतील विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. हे प्रकरण पॉक्सो कायद्यांतर्गत येत असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने शाळेला केवळ तीन दिवसांची मुदत देत स्पष्ट केले आहे की, समाधानकारक खुलासा न झाल्यास मान्यता रद्द करण्यासोबतच प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

या कारवाईमुळे शहादा शहरातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

६० वर्षाच्या नराधमानी ३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करूण तीचा खुण केला

Next Post

शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला

Related Posts

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
10
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न
ताज्या घडामोडी

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
9
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशिम जिल्हा सहसचिवपदी विनोद रोकडे (जैन) यांची नियुक्ती

November 1, 2026
10
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
1
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला
ताज्या घडामोडी

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
7
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा
ताज्या घडामोडी

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026
14
Next Post
शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला

शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In