• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड; शहाद्यात सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड; शहाद्यात सत्कार
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ०२ (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी संजय मोहिते यांची ‘बामसेफ’ (BAMCEF) या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शहादा येथील पंचशील ग्रुपच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे, संतोष कुवर, माजी मुख्याध्यापक नरेंद्र कुवर, पत्रकार बापू घोडराज, ग्रामसेवक प्रवीण खाडे, राजेंद्र आगळे, रमेश बर्डे, टेक्निशियन मिलिंद शिरसाट, मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे, प्राध्यापक चंद्रविलास बिराडे, बेलगाव आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक तुकाराम बागले, पोलीस नाईक धनंजय पवार, वेडू सूर्यवंशी आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळी बोलताना केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांनी सांगितले की, बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणे ही नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे पद मिळवण्यासाठी दीर्घकालीन कार्य, निष्ठा आणि संघटनेप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरते.

तत्पूर्वी, नंदुरबार येथे धुळे-नंदुरबार जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमातही संजय मोहिते यांचा गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना संजय मोहिते म्हणाले की, “गेल्या ३५ वर्षांपासून मी बामसेफ संघटनेत निष्ठेने काम करत आहे. संघटनेचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकणे हे मोठे आव्हान असते. ही जबाबदारी स्वीकारून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”

या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात पाटचारी बुजविणाऱ्या विकासकावर कारवाईची शिवसेनेची मागणी; रात्रीतच भराव हटवल्याने संशय वाढला

Next Post

शहाद्यात वीज वितरण कंपनीविरोधात ग्राहकांचा संताप वाढला

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

शहाद्यात वीज वितरण कंपनीविरोधात ग्राहकांचा संताप वाढला

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In