अल्लापल्ली (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर यांच्यामार्फत दि. २ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात अल्लापल्ली येथील धर्मराव कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७.४७ टक्के लागला असून, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत कुमारी कौमुदी विजय ऊरकुडे हिने ७६.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी अपूर्वा अनिल बंदूकवार हिने ६१.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमारी आकांक्षा सुशील गुप्ता हिने ६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमंत अमरीशराव महाराज, प्राचार्य श्री कोडेलवार सर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







