अहेरी (प्रतिनिधी)
एच.एस.सी. फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेचा निकाल दि. २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून, अहेरी येथील भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ८४.९६ टक्के लागला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९७.३६ टक्के, तर कला शाखेचा निकाल ६८.४२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत कु. सायरा हकीम हिने ७८.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कला शाखेत कु. अमृता कोंडागुर्ले हिने ७८.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून, दोन्ही विद्यार्थिनींनी तालुक्यात गुणानुक्रमे प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
प्राचार्य श्री शाहीद शेख यांनी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. तसेच वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव श्री अब्दुल जमीर हकीम, सौ. शाहीनताई हकीम (अध्यक्षा, दृष्टी फाउंडेशन अहेरी) यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य व शिक्षकांना दिले.








