• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

आजरा (जि. कोल्हापूर) : लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा मानाचा “लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार २०२६” यंदा ज्येष्ठ विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना प्रदान करण्यात आला. आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालनात हा सोहळा उत्साहात पार पडला.

या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत व भाकपचे केंद्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते करण्यात आले. निमंत्रण पत्रिकेनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे म्हणून अपेक्षित होते, मात्र काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत.

RelatedPosts

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाची सुरुवात द. ना. गव्हाणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. पुरस्कार स्वीकृतीनंतर संभाजी भगत यांनी आपल्या दमदार शाहिरी शैलीत क्रांतिकारी गीत सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या शाहिरीतून शोषित व वंचित घटकांच्या भावना प्रभावीपणे व्यक्त होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

विशेष म्हणजे, पुरस्कारासोबत मिळालेली १० हजार रुपयांची रक्कम त्यांनी सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून समितीकडे सुपूर्द केली. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कृतीचे उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई होते. यावेळी कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, खजिनदार सुनिल पाटील, उपाध्यक्ष मोहनराव देसाई, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज पवार यांनी केले, स्वागत कॉ. संपत देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय घाटगे यांनी मानले.

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांची क्रांतिकारी परंपरा आणि संभाजी भगत यांचा आवाज यांचा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

समाजभूषण पुरस्कार २०२६ जाहीर; प्रा. सुंदर बनसोडे यांना सन्मान

Next Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026
5
ताज्या घडामोडी

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026
2
ताज्या घडामोडी

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026
1
ताज्या घडामोडी

हरि आण्णा जाधव यांनी दर्शवली सामाजिक बांधिलकी; ‘क्रांतिसूर्य’ महाराणा प्रताप उत्सवाला आर्थिक बळ

June 17, 2026
27
ताज्या घडामोडी

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 17, 2026
57
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
22
Next Post
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

June 17, 2026

लातूर विमानतळ विकासासाठी ५६.७४ कोटींचा निधी मंजूर

June 17, 2026

जळकोट तालुक्यात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In