• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 03 (प्रतिनिधी):
शहादा शहरासह परिसरात सध्या बर्ड फ्लू बाबत मोठी चर्चा सुरू असून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम चिकन विक्रीवर झाला असून, ग्राहकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवल्याने विक्रेत्यांच्या दुकानांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

शहरातील काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या मोठ्या प्रमाणात दगावत असल्याच्या बातम्या वेगाने पसरल्या आहेत. त्यामुळे चिकन खरेदी करण्याबाबत नागरिक साशंक झाले असून अनेकांनी सध्या चिकन खाणे टाळल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी गर्दीने फुललेली दुकाने आता ओस पडलेली दिसत आहेत.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी नवापूर तालुक्यात झालेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाची आठवण नागरिकांना झाली आहे. त्या काळात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा बळी गेला होता. त्यामुळे पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्याच्या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. चिकन विक्री करणाऱ्या दुकानांमधील कोंबड्यांचा स्रोत, त्यांची वैद्यकीय तपासणी आणि स्वच्छतेचे नियम याबाबत कठोर तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषतः आजारी किंवा मृत कोंबड्यांची विक्री होत नाही ना, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

नागरिकांनीही सतर्क राहून स्वच्छतेचे नियम पाळावेत आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात वैशाखी बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन

Next Post

वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In