• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात वैशाखी बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात वैशाखी बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 03 (प्रतिनिधी):
शहादा येथील प्रशिक बुद्ध विहारात दि. १ मे रोजी वैशाखी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जगाला शांती व समतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

वैशाखी पौर्णिमेला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व असून याच दिवशी सिद्धार्थ गौतमांचा जन्म, सम्यक संबोधी प्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले. या तीनही पवित्र घटनांमुळे हा दिवस ‘त्रिगुणी पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्धाचार्य संजय निकम यांनी उपस्थितांना सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून दिले.

प्रशिक बुद्ध विहार, प्रज्ञा प्रतिष्ठान व जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समाज बांधवांसाठी भोजनदान व खिरदानाचेही आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघुनाथ बळसाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

हिरण्यकेशी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर; लवकरच पूर्णत्वाची शक्यता

Next Post

शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम

शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In