• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 05 – शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित व वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नगरपालिकेच्या पाणी टाक्या वेळेवर भरल्या जात नसल्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत शहादा नगरपालिकेतील बहुमतातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. शहरातील एक्सप्रेस फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यू. के. प्रसाद, सहायक अभियंता ए. टी. पाटील व शहर अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांच्याशी कडक शब्दांत चर्चा केली. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी फोन उचलत नाहीत आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.

“जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे? शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट मत नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच, वारंवार होणारी वीज खंडितता तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

नगरसेवकांनी महावितरण प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत १८ मेपर्यंत समस्या पूर्णपणे निकाली काढण्याची मागणी केली. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर महावितरण अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ठराविक कालावधीत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांच्यासह नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुनील काशिनाथ पाटील, ललित छाजेड, हरीश पाटील, मुनेशचंद्र जगदेव, सागर मराठे, यशवंत पाटील, नगरसेवक प्रतिनिधी डॉ. चंद्रभान कदम, निलेशभाई पाटील, एकनाथ नाईक, विकी ठाकरे, गणेश पाटील, भाजपा पदाधिकारी अजबसिंग गिरासे, रमाशंकर माळी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे उपस्थित होते.

Previous Post

स्ट्रीट लाईट व नाले सफाईसाठी उपाध्यक्षा माधवीताई पाटील आक्रमक

Next Post

सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक

सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In