• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीविरोधात शिवसैनिकांचा आवाज बुलंद व्हावा – माजी आमदार वैभव नाईक
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी) – सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिषांच्या राजकारणाला घाबरून न जाता त्याविरोधात ठाम आवाज उठवणारा प्रत्येक कार्यकर्ता शिवसैनिक बनला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विजय भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. नुकतीच जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “मी कोणत्याही अपेक्षेने जिल्हाप्रमुख पद स्वीकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. संघटना एका दिवसात वाढत नाही, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नातून ती निश्चितच बळकट होते. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र या दडपशाहीला घाबरून चालणार नाही, संघर्ष करणे गरजेचे आहे.”

बैठकीदरम्यान ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ज्येष्ठ शिवसैनिक आबू पटेल यांनी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी योग्य नेतृत्व दिल्याचे सांगत संघटन विस्तारासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जयसिंग नाईक यांनी भाजपवर टीका करत विरोधी पक्ष म्हणून ठाम भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सध्याच्या सरकारविरोधात जनतेत नाराजी असल्याचे सांगत गावागावात संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी वैभव नाईक यांनी पक्षनिष्ठा जपल्याचे कौतुक केले.

तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमास तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

वीज खंडिततेमुळे पाणीपुरवठा विस्कळीत; भाजप नगरसेवकांची महावितरण कार्यालयावर धडक

Next Post

नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
22
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
53
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
Next Post
नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

नरसापुर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In