• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिपळूण नागरी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरण: आमरण उपोषण स्थगित; १५ दिवसांत ठोस कारवाईचा अल्टिमेटम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिपळूण नागरी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरण: आमरण उपोषण स्थगित; १५ दिवसांत ठोस कारवाईचा अल्टिमेटम
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

रत्नागिरी (प्रतिनिधी) : चिपळूण येथील नागरी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर सभासदांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सहकार विभागाकडून प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

बहादूरशेख नाका परिसरातील पतसंस्थेच्या मुख्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाने दिवसभर परिसरात लक्ष वेधले. पतसंस्थेच्या कारभारात गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सभासदांनी यापूर्वीच सहकार विभागाकडे पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

RelatedPosts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

जिल्हा प्रशासनाच्या मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उपोषण थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीही अकबर शिकलकर, विकास हाडवे आणि सामाजिक कार्यकर्त्या राधा लवेकऱ यांनी शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयाने हस्तक्षेप करत चौकशी व कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “पंधरा दिवसांच्या आत आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.”

‘संघर्ष समिती’ची स्थापना

उपोषण स्थगितीनंतर पतसंस्थेचे खातेदार, ठेवीदार व सभासद एकत्र येत ‘चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार विरोधी संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली. आगामी काळात लढा अधिक संघटित आणि तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

११ ते १२ मे दरम्यान रंगणार थरार; २४ संघांच्या सहभागाने लोणवडी मैदान होणार क्रीडामहोत्सवाचे केंद्र

Next Post

थकीत ऊस देयकासाठी शेतकरी आक्रमक; ओंकार शुगर्सला टाळे ठोकण्याचा इशारा

Related Posts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
3
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
5
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
2
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
51
Next Post
थकीत ऊस देयकासाठी शेतकरी आक्रमक; ओंकार शुगर्सला टाळे ठोकण्याचा इशारा

थकीत ऊस देयकासाठी शेतकरी आक्रमक; ओंकार शुगर्सला टाळे ठोकण्याचा इशारा

ताज्या बातम्या

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In