• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खळद खून प्रकरण उकलले; आरोपी चेतन मांढरे अखेर जेरबंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
खळद खून प्रकरण उकलले; आरोपी चेतन मांढरे अखेर जेरबंद
0
SHARES
166
VIEWS
Ad 1

पुरंदर (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील खळद परिसरात सापडलेल्या अनोळखी इसमाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात सासवड पोलिसांना यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चेतन मुगुट मांढरे (वय ३४, रा. मांढर, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१४ फेब्रुवारी रोजी खळद येथील मोहन ढाब्याच्या शेजारी दगडांच्या ढिगाऱ्यात एक अनोळखी इसम नग्न व अर्धबेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, २३ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

RelatedPosts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

तपासादरम्यान मृताची ओळख राकेश उर्फ मिश्रीलाल छोटेलाल (वय ३३, रा. छोलामऊ, उन्नाव पुरवा, उत्तर प्रदेश) अशी पटली. शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ७ मार्च रोजी सासवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी नातेवाईक, सहकारी तसेच परिसरातील नागरिकांची सखोल चौकशी केली. विशेष पथक स्थापन करून तपास सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, हवालदार सूरज नांगरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चेतन मांढरे याचे नाव समोर आले.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवत गडहिंग्लज येथून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासामुळे अखेर या गूढ खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Previous Post

नसरापूर प्रकरणी न्यायासाठी हालचाल; माजी आमदार संग्राम थोपटे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Next Post

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

Related Posts

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
3
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
5
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
2
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
51
Next Post
खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

खोपोलीत बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ; मुलांना संस्कारांची नवी दिशा

ताज्या बातम्या

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

चांभुर्डीत कोट्यवधींची ‘जल जीवन योजना’ रखडली; वाड्यावस्त्या तहानलेल्या

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In