• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिसऱ्या मुंबई प्रकल्पावरून पनवेल, उरण आणि पेणमध्ये संताप; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

पनवेल | प्रतिनिधी

तिसऱ्या मुंबई प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या हालचालींना पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

शेतकऱ्यांच्या मते, सरकारकडून जमीन संपादनासाठी घाईगडबड सुरू असून, यापूर्वी प्रकल्पाविरोधात तब्बल १९ हजार हरकती नोंदवून संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, या हरकतींवर सुनावणी न घेता प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

“भाताच्या कोठारावर सिमेंटचे जंगल”

पनवेल, उरण आणि पेण हे भाग कोकणातील सुपीक आणि भात उत्पादनासाठी प्रसिद्ध मानले जातात. अशा जमिनींवर मोठ्या प्रमाणात शहरीकरण करून “सिमेंटचे जंगल” उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

“देश शेतीप्रधान असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतीयोग्य जमीन संपवली जात आहे. भविष्यात अन्नधान्य टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,” अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न

तिन्ही तालुक्यांतील काही लोकप्रतिनिधी MMRDA अधिकाऱ्यांसोबत गावोगावी बैठका घेत असून, प्रकल्पाचे फायदे आणि २२.५ टक्के भूखंड परताव्याचे आश्वासन देत नागरिकांना संमती फॉर्म भरण्यास प्रोत्साहित करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

मात्र, “या प्रकल्पाचे संभाव्य दुष्परिणाम, विस्थापन, शेतीवरील परिणाम आणि भविष्यातील सामाजिक प्रश्न याबाबत माहिती दिली जात नाही,” अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे.

“नवीन मुंबईचा अनुभव डोळ्यासमोर ठेवा”

काही ग्रामस्थांनी नवीन मुंबई परिसरातील मूळ रहिवाशांची सद्यस्थिती पाहूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. “तात्पुरत्या आर्थिक लाभाच्या मोहात न पडता पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे,” असे मतही व्यक्त करण्यात आले.

तिसऱ्या मुंबई प्रकल्पाबाबत सरकार, प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात या विषयावर मोठी जनचळवळ उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

आमदार प्रमोद जठार ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विधान परिषद निवडीनंतर प्रथमच जिल्ह्यात आगमन

Next Post

तेलंगणा बसच्या चाकाखाली युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post

तेलंगणा बसच्या चाकाखाली युवकाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In