• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख
0
SHARES
61
VIEWS
Ad 1

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आसदमध्ये विद्यमान सरपंचांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कडेगाव | प्रतिनिधी

“भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सामान्य कार्यकर्त्यालाही मोठे पद मिळवून देण्याची ताकद भाजपमध्ये आहे,” असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

कडेगाव तालुक्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोनहिरा खोऱ्यातील आसद गावातील विद्यमान लोकनियुक्त सरपंच आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विकासकामांच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला.

संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, “२०१९ साली शिवसेनेने मतदारसंघ विकला नसता तर भाजपचा काम करणारा आमदार कसा असतो हे दाखवता आले असते. मी आमदार झालो असतो तर विरोधकांना या मतदारसंघात डोके वर काढता आले नसते.”

ते पुढे म्हणाले, “स्व. कदम साहेबांचे योगदान आम्ही नाकारत नाही. मात्र राज्यमंत्री म्हणून विरोधकांनी नेमके काय काम केले, हा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्गावरून राजकारण केले जात आहे. सरकार शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही.”

आसद गावासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ८ कोटी रुपयांहून अधिक निधी दिल्याचे सांगत त्यांनी पुढेही गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल मोहिते, भाजपा तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सम्राट महाडिक म्हणाले की, “आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्षाची संपूर्ण ताकद उभी राहील.”

या कार्यक्रमात आसद गावचे लोकनियुक्त सरपंच मोहन जगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद आंगवणे, किरण जाधव, उमेश भोकरे, आदिनाथ यादव, सौरभ धुमाळ यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

तसेच ताकारी योजना टप्पा क्रमांक ३ अंतर्गत वितरण रस्ता डांबरीकरण या विकासकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास तानाजीराव जाधव, हरी जाधव, सतीश जाधव, बाळासो जाधव, भानदास जाधव, संभाजी जाधव, मारुती निकम, संदीप जाधव, उत्तम जाधव, भगवान मुळीक, अनिल मुळीक, पत्रकार संदेश जाधव, नितीन जाधव, प्रविण जाधव, हणमंत जाधव, डॉ. सुधीर जाधव, सचिन जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम करू नये” — आ. संजनाताई जाधव

Next Post

गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
24
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
167
Next Post
गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी

गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In