• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

साळगाव (प्रतिनिधी) – आजरा तालुक्यातील निसर्गरम्य साळगाव येथे तब्बल १७ वर्षांनंतर ग्रामदैवत श्री लक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल्या या गावात निसर्गसौंदर्य आणि भक्तीचा अपूर्व संगम अनुभवायला मिळत आहे.

चित्रा, हिरण्यकेशी नद्या आणि चित्री धरणाच्या पाण्यामुळे आजरा तालुका ‘सुजलाम-सुफलाम’ म्हणून ओळखला जातो. त्यातच हिरण्यकेशी नदीच्या कुशीत वसलेल्या साळगावचे सौंदर्य यात्रेच्या निमित्ताने अधिक खुलून दिसत आहे. नदीकाठी असलेले विठ्ठल-रखुमाई मंदिर, पुरातन वडाची झाडे आणि संथ वाहणाऱ्या नदीतील त्यांचे प्रतिबिंब पाहून भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे परिसर अधिकच आकर्षक दिसत आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

१७ वर्षांनंतर यात्रा होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण असून, पाहुणे-रावळ्यांनी संपूर्ण गाव गजबजून गेले आहे. घरोघरी नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटीगाठी रंगत असून गावातील वातावरण आनंदमय झाले आहे. यात्रेनिमित्त खेळणी, मिठाई, पाळणे आणि विविध दुकानांनी गावची वेशी फुलून गेली आहे.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या यात्रेत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. संपूर्ण गाव आणि मंदिर परिसर झगमगत्या रोषणाईने उजळून निघाला असून साळगावचे हे नयनरम्य रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

निसर्गाची मुक्त उधळण आणि ग्रामदैवतावरील श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ साळगावच्या या लक्ष्मी यात्रेत अनुभवायला मिळत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

Previous Post

मंठा पंचायत समितीचे अधिकारी जोमात, सर्वसामान्य जनता कोमात!

Next Post

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
24
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
167
Next Post
स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In