सिरसंगी (ता. आजरा) – आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील श्री क्षेत्र गोठणदेव या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या स्वर्गीय शंकर साटपे यांच्या स्मरणार्थ भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील यांनी स्व. शंकर साटपे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “स्व. नरसिंगराव पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून कै. शंकर साटपे यांनी अनेक वर्षे निष्ठेने सामाजिक कार्य केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, या हेतूने त्यांचे सुपुत्र मारुती साटपे यांनी हे भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. पितृऋण फेडण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”
या प्रवेशद्वारामुळे श्री क्षेत्र गोठणदेव परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडली असून पर्यटनस्थळाच्या आकर्षणात वाढ झाली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या उद्घाटन सोहळ्यास मुकुंददादा देसाई, प्रवेशद्वार निर्माते मारुती साटपे, अभयदादा देसाई, सुभाष देसाई, सरपंच संदीप चौगुले, मधुकर यलगार, दिगंबर देसाई यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











