• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न
0
SHARES
227
VIEWS
Ad 1

पिंगळी | प्रतिनिधी

पिंगळी गावातील गोपाळ समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या मंदिरात दिनांक ३ व ४ मे २०२६ रोजी ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले होते.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

सोहळ्यानिमित्त वेदघोष, पूजन, कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तसेच दूरवरच्या गावांमधून भाविक आणि गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्रोच्चार, ध्वजारोहण, कलश पूजन, देवतांची स्थापना व पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. ३ मे रोजी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर श्री राधा–कृष्ण मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या मंगलमय धार्मिक विधीसाठी वेदमूर्ती श्री वैजनाथ महाराज कंठाळे यांच्यासह विविध संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये श्रीमंत १०८ गोपाळ गिरी आनंद गिरी महाराज (दतबर्डी संस्थान), सद्गुरू महंत मृत्युंजय महाराज (केदारनाथ संस्थान), परमपूज्य विरारदास महाराज (समिधा श्री कोंडलिंगेश्वर देवस्थान, शिवपुरी), सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव मठ संस्थान, हादगाव) तसेच निराधारजी महाराज (उदासीन पंचायत बडा आखाडा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता.

या सोहळ्यात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे सुपुत्र शिवराज पाटील कदम यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. ह.भ.प. श्री भिमराव महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थितांना भक्तिरसात मंत्रमुग्ध केले. तसेच विविध भजनी मंडळांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

गोपाळ समाज बांधव आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वीपणे पार पडला. शेवटी गुरुवर्य शोभा माय यांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, संत-महंत आणि भाविकांचा सत्कार करण्यात आला.

Previous Post

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
24
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
167
Next Post
गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In