• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
वॉचमन काका’च ठरला नराधम; कामोठ्यात सुरक्षारक्षकाकडून तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

पनवेल/कामोठे(प्रतिनिधी):
ज्यांच्याकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपवली जाते, त्याच व्यक्तीने माणुसकीला काळिमा फासल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील कामोठ्यात घडली आहे. एका नामांकित गृहनिर्माण सोसायटीत तैनात असलेल्या पंकज अजयसिंग सिंग या सुरक्षारक्षकाने तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे उघड झाले असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज सिंग हा संबंधित सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. लहान मुलांसाठी तो ‘वॉचमन काका’ होता. मात्र, या नराधमाने मुलांच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला. ६, ७व ९ वर्ष वयाच्या मुली सोसायटीच्या आवारात खेळत असताना पंकजने त्यांना एकटे गाठून त्यांच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला.मुलींनी दाखवले धाडसया प्रकारानंतर तिन्ही मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यांनी हिंमत न हारता तातडीने घर गाठले आणि पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आपल्या चिमुकल्यांसोबत घडलेला हा घृणास्पद प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी तत्काळ सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, सुरक्षारक्षाचे संतापजनक कृत्य कॅमेरात कैद झाल्याचे स्पष्ट झाले.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

पालकांनी वेळ न घालवता तातडीने कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी पंकज अजयसिंग सिंग याला बेड्या ठोकल्या असून याच्या विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पॉक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सोसायट्यांनी सुरक्षारक्षकांची नेमणूक करताना त्यांची पार्श्वभूमी तपासणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.

Previous Post

गडचिरोलीत उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; दोषी डॉक्टरांना बडतर्फ करण्याची एनएसयुआयची मागणी

Next Post

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
18
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
24
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In