• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
एसटी आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने पाच महिन्यांत केलेल्या कामाचा आढावा द्या : गोर सेनेची राज्य सरकारकडे मागणी
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, हैदराबाद गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात महाराष्ट्रभर ५५ महामोर्चे काढण्यात आले होते. तसेच गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष Sandesh Chavan यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी नांदेड येथे रेल्वे रोखण्याचाही इशारा देण्यात आला होता.

यानंतर राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि बंजारा समाजाच्या शिष्टमंडळामध्ये सविस्तर बैठक झाली होती. या बैठकीनंतर एसटी आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली होती.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

मात्र गेल्या पाच महिन्यांत या समितीने नेमके कोणते काम केले, कोणत्या दिशेने अभ्यास सुरू आहे, याबाबत समाजाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने गोरबंजारा समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. समिती केवळ कागदापुरती मर्यादित राहिली आहे का, अशी शंका समाजामध्ये व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरातील ३०० पेक्षा अधिक ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.

गोरबंजारा समाज हा स्वतंत्र गोरधाटी संस्कृती, गोरबोली भाषा, विशिष्ट पेहराव, तांडा संस्कृती, रुढी-परंपरा आणि आर्थिक मागासलेपण यांसारख्या आदिम सभ्यतेच्या वैशिष्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप समाजाचा विमुक्त जाती ‘अ’ प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.

गेल्या ७५ वर्षांपासून समाजाची एसटी आरक्षणाची मागणी प्रलंबित असून, या मागणीसाठी अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच पाच युवकांनी आत्मबलिदान दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

समितीने आजपर्यंत केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल समाजासमोर मांडावा, अशी मागणी गोर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव, तालुकाध्यक्ष, तालुका सचिव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी जिवती तहसीलदारांना निवेदन

Next Post

मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
74
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
166
Next Post
मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात

मानवत नगर परिषद अंतर्गत जनगणना-२०२७ साठी प्रशिक्षणास सुरुवात

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In