• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
खेड पिंपरी–पापड रस्त्याच्या कामाला गती; सरपंचांच्या पाठपुराव्याला यशाची दिशा
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

खेड़ पिंपरी प्रतिनिधी :

खेड़ पिंपरी गावाकरिता सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या श्रमांना अखेर यश मिळण्याच्या मार्गावर असून खेड पिंपरी ते पापड या ५ किमी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

सदर रस्ता अत्यंत दुर्गम व खराब अवस्थेत असल्याने पापड, पिंपडगाव, शिवरा, सालोड, देऊळगाव, खेड पिंपरी या गावांतील नागरिकांना अमरावती येथे दवाखाना, कॉलेज व शाळेसाठी जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. सायकल चालविणेही कठीण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.

हा रस्ता भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पापड गावाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासासाठी ग्रामसभेत अनेक वेळा चर्चा करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर सरपंच मंगेश कांबळे यांनी मा. आमदार प्रतापदादा अडसड यांना प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर करण्याची मागणी केली. तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महसूल मंत्री व पालकमंत्री Chandrashekhar Bawankule यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली होती.

सरपंचांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व आमदार प्रताप अडसड यांच्या विशेष सहकार्याने हा रस्ता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ५.१८ मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता व आवश्यक पुलाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी विरुळकर व इंगोले यांनी दिली आहे.

प्रत्यक्ष पाहणी व मोजमापही पूर्ण करण्यात आले असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या यशामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सरपंचांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौधरी, संतोष चौधरी, रुपेश राऊत, विलास सावदे, योगेश डांगे, पवन जाधव, प्रमोद राऊत, संतोष शेळके तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी विरुळकर साहेब आदी उपस्थित होते.

Tags: Maroti Kalelar
Previous Post

आंबेडकर व महापुरुषांच्या विचारधारा व राष्ट्रप्रेम हीच बहुजनांची संपत्ती – सैदप्पा झळकी

Next Post

न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
9
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
49
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा

न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In