• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग
0
SHARES
125
VIEWS
Ad 1

माहूर | राजकीय वार्ता

माहे डिसेंबर २०२६ मध्ये होऊ घातलेल्या माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

सन २०२१ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ७, काँग्रेस ६, शिवसेना ३ व भाजप १ असे नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र सत्ता स्थापन केली होती.

सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत विभागणी झाल्याने त्यांच्या राजकीय गणितांवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. मात्र माहूर नगर पंचायतीत दोन्ही पक्षांची आघाडी अजूनही टिकून असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना उबाठा गटाकडून उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ नाना लाड हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून आमदार Bhimrao Keram यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष व विद्यमान एकमेव नगरसेवक गोपू महामुने यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच भाजपकडून माहूर नगर पंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस श.प.चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांच्या जोरावर पुन्हा सत्ता राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू आहे. तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे हे घरकुल व स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून जनतेची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या तसेच पारंपरिक काँग्रेस समर्थक मतदार हा काँग्रेससाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

एमआयएमकडून युवा नेते इर्शाद मकरानी यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याची शक्यता असून तालुकाध्यक्ष सज्जाद शेख यांनी तयारीला वेग दिला आहे.

दरम्यान, माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजपकडून त्यांना ऐनवेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशीही चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे.

आगामी सहा महिन्यांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत असून माहूर नगर पंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Previous Post

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

Next Post

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In