रावेर : प्रतिनिधी
रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १० वी एसएससी परीक्षा फेब्रुवारी २०२६ चा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गौरव संदीप सूर्यवंशी याने ४६३/५०० गुण मिळवत ९२.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जयेष युवराज महाजन याने ४३० गुणांसह द्वितीय, तर मानव विरेंद्र सूर्यवंशी याने ४२९ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
गौरव सूर्यवंशी याने गणित विषयात ९२, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात ९५ आणि सामाजिक शास्त्र विषयात ९४ गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.
यावर्षी शाळेतून एकूण २६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ६९.०८ टक्के लागला आहे.


