• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करा – बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करा – बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी : आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा रत्नागिरी कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार दापोली यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार, अमोल पावरा, दत्तात्रय वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी समाजाच्या जात विशेष पदभरतीच्या घोषणा शासनाकडून वारंवार केल्या आहेत. विधिमंडळातही पदभरतीच्या अनुषंगाने अनेकदा चर्चा झाली, आश्वासने देण्यात आली. मात्र, सात वर्षांनंतरही १२ हजार ५०० पदांच्या विशेष पदभरतीचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे शासन पदभरती राबविणार तरी कधी, असा सवाल तरुणांकडून करण्यात येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये आदिवासींच्या राखीव पदांच्या अनुषंगाने निर्णय दिला होता. निर्णयाच्याअंमलबजावणीसाठी नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली. शासकीय व निमशासकीय सेवेत आदिवासींकरिता राखीव असलेली पदे गैरआदिवासींनी खोटे जातप्रमाणपत्र सादर करून बळकावल्याचे प्रतिज्ञापत्र खुद्द शासनानेच न्यायालयात दिले होते.६, ८१० जागा रिक्त करून केवळ १,३४३ पदांची भरती ही पदे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिकामी करून भरण्यात येणार होती. परंतु, आजपर्यंत ६ हजार ८१० पदेच रिकामी केली असून, केवळ १ हजार ३४३ पदेच भरली आहेत. उर्वरित ११ हजार २२७पदांची भरती रखडली आहे.

राज्यातील शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्थासंह अनेक विभागातील जागा रिक्त आहेत.शासनाने १४ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून गट १ क व गट ड मधील पदे भरण्याची कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.२०२५ मध्ये सह्याद्री ३ अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन तीन महिन्यांत जाहिराती काढण्याची जबाबदारी सामान्य प्रशासनावर सोपविली होती. सदर डेडलाइन संपली तरीही विशेष पदभरती जाहिरातीची प्रतीक्षा कायम आहे. तरी आदिवासींची १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

Previous Post

४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला परतूरच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
61
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
159
Next Post

इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्हा परिषद प्रशाला परतूरच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In