• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

लेखक चंदू राठोड यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, कष्ट आणि आर्थिक स्वावलंबनाचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आत्मकथन “जांगड” सध्या वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे. कष्ट, जिद्द आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या जीवनप्रवासाचे वास्तव दर्शन घडविणारे हे आत्मकथन वाचकांना अंतर्मुख करणारे ठरत आहे.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि संपन्नता मिळवून देण्यासाठी लेखकाने केलेल्या अथक परिश्रमांचा आलेख या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. पणजोबा, आजोबा, वडील यांच्यापासून स्वतः आजोबा होईपर्यंतच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचे अनुभव लेखकाने अत्यंत जिवंत शैलीत मांडले आहेत.

लेखकाने आपल्या गाव-तांड्यातील प्रेमळ, सहकार्य करणारे आणि सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या माणसांचे चित्रण हळुवार शैलीत केले आहे. त्याचबरोबर समाजातील आपमतलबी, व्यसनी, अंधश्रद्धाळू, कपटी आणि दुराचारी प्रवृत्तीवरही भाष्य करत वास्तववादी मांडणी केली आहे.

या आत्मकथनाला डॉ. युवराज पवार यांनी विस्तृत प्रस्तावना लिहिली असून डॉ. सुभाष राठोड यांनी समर्थ पाठराखण केली आहे. त्यामुळे पुस्तकाची साहित्यिक उंची अधिक प्रभावी बनली आहे.

“जांगड” या आत्मकथनात विदर्भ-मराठवाडा सीमाभागातील दारव्हा, दिग्रस, आर्णी, पुसद, माहूर, किनवट, मांडवी, सारखानी, लालूनाईक तांडा अशा अनेक गाव-तांड्यांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वास्तव उलगडण्यात आले आहे. ग्रामसंस्कृती, जत्रा, यात्रांचा उत्साह, लोककला, नाटक, एकांकिका, शेती-माती आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन लेखकाने जिवंत शब्दांत घडविले आहे.

शिक्षणातील अपुऱ्या सुविधा, वसतिगृहातील हालअपेष्टा, शेतीची कामे, जनावरांची राखण अशा अनेक संकटांवर मात करत लेखकाने स्वतःच्या कलागुणांना वाव दिला. अभिनय आणि कलेची आवड जोपासत स्वतःचे कला मंडळ स्थापन करून त्यांनी आयुष्याला नवी दिशा दिली.

जीवनातील संकटांचा सामना करत आर्थिक स्वावलंबनाचे चक्र फिरवून संसाराला स्थैर्य आणि आनंद देणाऱ्या या संघर्षमय प्रवासामुळे “जांगड” हे आत्मकथन वाचनीय आणि प्रेरणादायी ठरले आहे.

पुस्तकाची माहिती :

  • आत्मकथनाचे नाव : “जांगड”
  • लेखक : चंदू डोमा राठोड
  • प्रकाशक : स्वयं प्रकाशन, पुणे
  • एकूण पृष्ठे : २२४
  • पुस्तक मूल्य : २७० रुपये
  • संपर्क : ९०४९२२०४९०
Tags: Kundan Tivadkar
Previous Post

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापन दिन ५ जूनला; माहूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा

Next Post

पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In