• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

एकाच छताखाली २८ विभागांच्या योजनांचा लाभ; २३४० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सेवा

केळापूर प्रतिनिधी :

पाटणबोरी येथे दिनांक ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न झाले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या शिबिरासाठी एकूण २६४८ नागरिकांनी उपस्थिती लावली होती. विविध २८ शासकीय विभागांमार्फत नागरिकांना योजनांची माहिती तसेच विविध सेवांचा लाभ देण्यात आला. शिबिरादरम्यान २३४० लाभार्थ्यांना विविध दाखले, योजना व लाभांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पाटणबोरी हे गाव तेलंगणा सीमेजवळ असल्याने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तेलगू गाण्यावरील नृत्याला विशेष दाद मिळाली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांनी HPV लस व क्षयरोग (TB) विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी गरोदर मातांना ‘बाल सुरक्षा किट’ वाटप करण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी श्री. प्रशांत पायघन यांनी ग्रामीण पशुधन योजना व शेतीपूरक व्यवसायांबाबत माहिती दिली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. विजय भागाननगरकर यांच्या हस्ते कृषी पंपाचे वाटप करण्यात आले.

महिला बचत गटांना बँकेमार्फत प्रति गट १ लाख ५० हजार रुपये गटसाहाय्य निधी देण्यात आला. तसेच भारतीय स्टेट बँक, पाटणबोरी शाखेच्या वतीने लाभार्थ्यांना पिककर्ज वाटप करण्यात आले.

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ‘कर्तव्य पथ’ कार्यक्रमात सलग ४ ते ५ वर्षे सहभाग नोंदवणारे मूर्तीकार श्री. यशवंत एनगुर्तीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव अंधारवाडी मध संकलन केंद्राचा स्टॉल शिबिरात आकर्षणाचे केंद्र ठरला.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पुल्लजवार, अनिल गुंडेवार, विनोद निम्मलवार यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. दिपाली सुरावार होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये उपजिल्हाधिकारी अमोल एलगट्टे, तहसीलदार राजेंद्र इंगळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली नालमवार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार श्री. राजू मोट्टेमवार यांनी केले.

यावेळी मंडळ अधिकारी श्री. एम. के. कुळसंगे, ग्राम महसूल अधिकारी श्री. टेकाम, श्री. धुंड्रॉवार, श्री. पवार, श्री. नैताम, श्री. कनाके, सविता मरापे तसेच महसूल सेवक सुजाता निम्मलवार, कोंडावार, पेंदोर, रामगिरवार यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.

Tags: Vishal Halavale
Previous Post

कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

Next Post

ताडोबाच्या ‘विरा’ वाघिणीने चौथ्यांदा दिला पिल्लांना जन्म; पळसगाव गेट परिसरात दिसली पहिली झलक

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
ताडोबाच्या ‘विरा’ वाघिणीने चौथ्यांदा दिला पिल्लांना जन्म; पळसगाव गेट परिसरात दिसली पहिली झलक

ताडोबाच्या 'विरा' वाघिणीने चौथ्यांदा दिला पिल्लांना जन्म; पळसगाव गेट परिसरात दिसली पहिली झलक

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In