• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापन दिन ५ जूनला; माहूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचा वर्धापन दिन ५ जूनला; माहूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ

प्रतिनिधी

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ५ जून रोजी श्रीक्षेत्र माहूर येथे भव्य पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसह निर्भय, निःपक्षपाती व जनहितासाठी कार्यरत पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

शहर आणि ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेक अडचणी, दबाव व समाजकंटकांकडून त्रास सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढताना पत्रकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या पाठीशी संघटितपणे उभे राहता यावे या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून ‘निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसह सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, अध्यात्म, कायदेविषयक आणि इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले की, “पत्रकार हा लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ असून तो तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतो. मात्र, अनेकदा पत्रकारांना अपेक्षित संरक्षण व सन्मान मिळत नाही. त्यामुळे पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.”

या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी तसेच निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी माहूर येथे जय्यत तयारी सुरू असून पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

पनवेल परिसरावर शोककळा: सदगुरू वामनबाबांचे तळोजे मजकूर येथील निष्ठावंत अनुयायी ह.भ.प. रामदास बाबा पाटील यांचे वैकुंठगमन

Next Post

कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In