• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिरूर नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते लोकार्पण
0
SHARES
162
VIEWS
Ad 1

पुणे / प्रतिनिधी

शिरूर शहरातील वाढती लोकसंख्या, दाट वस्त्या आणि विविध आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन शिरूर नगरपरिषदेच्या अग्निशमन व बचाव व्यवस्थेत महत्त्वाची भर घालण्यात आली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांच्या विशेष प्रयत्नातून नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवीन ‘मिनी रेस्क्यू टेंडर’ दाखल झाले असून त्यामुळे शहरातील आपत्कालीन सेवा अधिक गतिमान आणि प्रभावी होणार आहेत.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती तसेच तातडीने मदतीची आवश्यकता असलेल्या भागांमध्ये हे वाहन विशेष उपयुक्त ठरणार आहे. आग, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध बचाव मोहिमांमध्ये या वाहनाचा प्रभावी वापर होणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या अत्याधुनिक मिनी रेस्क्यू टेंडरमध्ये अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कटर आणि स्प्रेडरसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच प्रथमोपचार किट, उच्च दाबाचा पाण्याचा पंप आणि होज रील यांचाही समावेश करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल किंवा रासायनिक पदार्थांमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे.

रात्रीच्या वेळी शोध व बचावकार्य अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी वाहनात हाय-इंटेंसिटी लाइट्सची विशेष प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अंधारातही बचाव पथकांना तातडीने आणि सुरक्षितरीत्या काम करणे शक्य होणार आहे.

आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी सांगितले की, “शहराच्या वाढत्या व्याप्तीबरोबर आधुनिक आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे अत्याधुनिक मिनी रेस्क्यू टेंडर महत्त्वाची भूमिका बजावेल.”

नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे म्हणाल्या की, “शहरातील नागरिकांची सुरक्षितता ही नगरपरिषदेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नव्याने दाखल झालेले हे वाहन जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”

या वाहनाचे लोकार्पण नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, आयेशा सय्यद, स्वाती साठे, नगरसेविका संगीता मल्लाव, चारुशिला कोळपकर, स्वप्नाली जामदार, नगरसेवक अभिजित पाचर्णे, सागर नरवडे, निलेश गाडेकर, संतोष थेऊरकर तसेच प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, सचिन वाळूंज, अग्निशमन अधिकारी महेश कदम आदी उपस्थित होते.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

Next Post

द्वारका सर्कल ते नाशिकरोड दहापदरी रस्त्याला मंजुरी; २२० कोटींच्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटणार

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post

द्वारका सर्कल ते नाशिकरोड दहापदरी रस्त्याला मंजुरी; २२० कोटींच्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी सुटणार

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In