• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
नगरपालिकांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

– पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे निर्देश

महिला बचत गटांना ओपन स्पेसची जबाबदारी देण्याचे निर्देश
पावसाळ्यापूर्वी महावितरणने देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत

वर्धा, दि. ९ (जिमाका) : नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या गरजांनुसार आणि प्राधान्यक्रम ठरवूनच विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. विशेषतः शहरातील मोकळ्या जागांचे संरक्षण, अभ्यासिकांचे व्यवस्थापन, शाळांतील मूलभूत सुविधा आणि नागरी समस्यांवरील तातडीच्या उपाययोजनांना अग्रक्रम देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, नगरपालिकांनी शहरी महिला बचत गटांच्या बैठका घेऊन इच्छुक गटांना शहरातील मोकळ्या जागांची जबाबदारी द्यावी. त्या ठिकाणी लहान स्वरूपाचे निवारे किंवा कार्यालय उभारून महिलांना उद्योग सुरू करता येतील का, याचा विचार करण्यात यावा. तसेच उद्यानांच्या देखभालीची कामेही महिला बचत गटांकडे सोपवावीत. त्यामुळे अतिक्रमण रोखण्यास मदत होईल आणि अनधिकृत उपक्रमांवर नियंत्रण राहील. हा विषय एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वर्धा नगरपालिकेतील अभ्यासिकांचे योग्य व्यवस्थापन नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत, सुरू असलेल्या अभ्यासिका सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवस्थित चालवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नगरपालिका शाळांमध्ये स्वच्छ शौचालये, बाथरूम, शुद्ध पिण्याचे पाणी, वर्गखोल्यांतील गळती दुरुस्ती आणि प्रयोगशाळांतील सुविधा यांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बांधकाम विभागाने केवळ अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रियेत अडकून न राहता उभारण्यात आलेल्या मालमत्तेच्या जतनाकडेही लक्ष द्यावे, असे सांगत आरोग्य व बांधकाम विभागांनी संयुक्त नियोजनातून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयातील दुरुस्ती कामांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय मृद व जलसंधारण विभागाने अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार समीर कुणावार यांनीही बैठकीत विविध स्थानिक प्रश्न उपस्थित केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करताना आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर अडचणी आल्यास विभागप्रमुखांना तत्काळ अवगत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत पशुसंवर्धन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, लघुपाटबंधारे, महिला व बालविकास आदी विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Tags: Shankar Panbude
Previous Post

शेतकऱ्यांना पिक कर्ज तात्काळ मंजूर करण्याकरीता बँकांनी समन्वयाची भूमिका बजावावी-पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
8
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
8
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In