• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव

वर्धा, दि. ९ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि बालसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व संस्थांना प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या चार वर्षांतील पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सन २०२०-२१ चा पुरस्कार विजया विठ्ठलराव ढगे यांना प्रदान करण्यात आला. केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. तसेच बालिकांच्या उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याबरोबरच गावातील महिलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठीही उल्लेखनीय योगदान दिले.

सन २०२१-२२ चा पुरस्कार जयश्री सुनिल कोटगीरवार यांना देण्यात आला. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून शिक्षणाबाबत जनजागृती केली. तसेच ‘लेक वाचवा’ आणि ‘तोची भोंदू ओळखावा’ यांसारख्या विषयांवरील लेखनातून सामाजिक प्रबोधन केले.

सन २०२२-२३ चा पुरस्कार छाया हरीभाऊ राडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी ‘बेटी बचाव’, जीवनमूल्य शिक्षण, मासिक पाळीविषयक जागृती आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवून महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. ‘हृदय स्पंदन’ उपक्रमांतर्गत त्यांनी ‘कविता माँ’, ‘नवी पालवी’, ‘महिलांचे साहित्यातील भागीदारी’ आणि ‘स्त्री मन आक्रोश’ यांसारख्या लेखनातून महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले.

सन २०२३-२४ चा पुरस्कार अनिता गणेश उगे यांना प्रदान करण्यात आला. मानधनी विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांनी अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पुढाकार घेत आरोपीविरोधात स्वतः फिर्याद दाखल केली. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या वतीने त्यांना ‘बालरक्षक’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे स्वरूप आहे. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Shankar Panbude
Previous Post

नगरपालिकांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवूनच सादर करावेत

Next Post

जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
8
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
8
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार

जनसंवादाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ पोहोचविणार

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In