प्रतापसिंह विद्यालय, चांदापुरी येथील इयत्ता दहावीचा निकाल यंदा 87.95 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये कु. श्रावणी जयसिंग मगर हिने 93 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. तृप्ती नवनाथ शेटे हिने 91.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. समृद्धी नवनाथ मगर हिने 88 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच कु. सानिका बजरंग मगर हिने 87.20 टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळवला असून, चि. ओम रामचंद्र निकम याने 85.40 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
विशेष म्हणजे, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मारकड सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





