• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आई… हा शब्द उच्चारला तरी मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अनुभव येतो…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in लेख
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

आज “मदर्स डे” निमित्त एकच सांगावंसं वाटतं..

आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमावला, कितीही यश मिळवलं… तरी आईचे उपकार कधीच फेडू शकत नाही. विचार करा तुम्ही जेव्हा अगदी लहान बाळ होता, तेव्हा तुम्ही रडत असाल, आजारी पडत असाल, रात्र रात्र झोपत नसाल, तेव्हा तुम्हाला काहीच कळत देखील नव्हतं. पण त्या प्रत्येक क्षणी तुमची आई मात्र जागी होती. तुमच्या एका छोट्याशा वेदनेने तिचं मन सैरभैर व्हायचं, तुमच्या आजाराने तिची रात्रभर झोप उडायची.

RelatedPosts

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

तुम्हाला चालायला शिकवणारी, बोलायला शिकवणारी, हे सुंदर जग दाखवणारी आई, मोठं झाल्यावर मात्र काही मुलं स्वतःला खूप शहाणी समजू लागतात आणि आईलाच किरकोळ समजू लागतात, हीच आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

ज्या आईने स्वतःच्या वेदना सहन करून नऊ महिने आपल्याला पोटात वाढवलं, रात्रभर जागून आपल्यासाठी आयुष्य घालवलं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्या चेहऱ्यावरचं हास्य जपलं… त्या आईसाठी एक दिवसाचा “स्टेटस” किंवा फोटो महत्वाचा नाही.
आईला फक्त सोशल मीडियावर पोस्ट करून प्रेम दाखवू नका, तर तिच्या जिवंतपणी तिच्या सोबत उभे रहा. तिच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोला, तिची विचारपूस करा, तिच्या भावना समजून घ्या.

आजकाल एक दुर्दैवी वास्तव हे दिसतंय की,
लग्नानंतर काही मुलं पत्नी आणि आई यांच्यात समतोल साधण्याऐवजी आईलाच दूर करतात. पण लक्षात ठेवा, पत्नी आयुष्यात नंतर येते… पण आईने जन्मापासून शेवटपर्यंत फक्त तुमच्यासाठीच जगलेलं असतं.
याचा अर्थ पत्नी चुकीची आणि आई बरोबरच असे नाही पण, दोघींमध्ये समजूतदारपणे समतोल राखणं ही मुलाची जबाबदारी आहे.
घरात शांतता हवी असेल तर कोण बरोबर आणि कोण चूक यापेक्षा दोघीही आपल्या आहेत ही भावना महत्त्वाची आहे.

ज्या आई-वडिलांनी आपल्या लेकरांसाठी संपूर्ण आयुष्य झिजवलं, त्यांना म्हातारपणी एकटं सोडणं, वृद्धाश्रमात ठेवणं किंवा त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं… यापेक्षा मोठं पाप नाही.
कारण वेळ प्रत्येकाची येते…
आज तुम्ही तरुण आहात, उद्या तुम्हीही आई-वडील होणार आहात.
तुमची मुलं तुमच्याशी कसं वागतील, हे बऱ्याचदा तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी कसं वागता यावर ठरतं.
म्हणून…
आई-वडिलांना ओझं समजू नका,
त्यांना वेळ द्या… प्रेम द्या… आदर द्या…
कारण त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या फोटोपुढे रडून काहीच उपयोग नसतो.
आई जिवंत असेपर्यंत तिचा हात हातात घ्या,
तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा…
कारण देव दिसत नाही, पण आई या रूपात देव प्रत्येकाच्या घरी असतो,
सर्व मातांना आणि मातृप्रेम जपणाऱ्या प्रत्येकाला
“मदर्स डे”च्या खूप खूप शुभेच्छा..

😊तुमचाच,😊
ॲड.आविनाश चिकटे
“जिल्हा व सत्र न्यायालय पुणे”
Whatsapp-9923237287

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

सरकारच्या कंपनी धार्जिण्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: आमदार कैलास पाटील यांचा घणाघात

Next Post

वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल
लेख

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
22
लेख

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

May 15, 2026
34
लेख

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

May 13, 2026
738
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-
लेख

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

April 14, 2026
7
मला भेटलेली अनामिका…!

मला भेटलेली अनामिका…!

March 8, 2026
25
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
52
Next Post
वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

वर्धा जिल्ह्यातील हमाल कामगारांना तब्बल रु. १.७५ कोटींची थकीत लेव्ही मंजूर; आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In