• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in लेख
0
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांची उंची काळालाही मोजता येत नाही. ज्यांच्या विचारांचा वेध आकाशी घेऊ शकत नाही. ज्यांचे देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा काळाच्या कसोटीवर सोन्यासारखे लख्ख उजळून निघालेले असते व त्यांचे कार्य उभ्या राष्ट्रासाठी दीपस्तंभा सारखे प्रेरणादायी ठरते. अशा महान योग्यतेचे एक आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे समस्त भारतीयांचे उद्धार करते, मानवतेचे मित्र, थोर समाज सुधारक, स्त्रियांचे, उपेक्षितांचे कैवारी, शोषितांचे कुशल संघटक, अन्यायविरुद्ध धैर्याने लढणारे अजिंक्य योद्धे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या जीवन मूल्यांचे प्रबळ समर्थक, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते, भारताचा सर्वांगीण विकास साधू शकेल अशा भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, महान विचारवंत,संसदपटू, प्रभावी वक्ते,थोर लेखक ग्रंथ प्रेमी, निष्णांत कायदे पंडित, जनहितासाठी ज्ञानाचा उपयोग करणारे महान विद्वान, सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत होते.

RelatedPosts

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

आई… हा शब्द उच्चारला तरी मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अनुभव येतो…


भारतीय संविधानातून सर्व नागरिकांचे जीवनमान उंचवणारे, सर्वांना समान हक्क अधिकार, कायद्याने बहाल करणारे, अनुसुचित जाती, जमाती, जनजाती, धार्मिक,अल्पसंख्याक, आर्थिक व सामाजिकदृष्टा मागासवर्गाच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारे, शिक्षण, आरोग्य, सरंक्षण, व्यवसाय, कंपनी, विद्यापीठे, न्यायालय,संसद, संघटना यांना मार्गदर्शन करणारे, तरतुदीनुसार नियोजन, संघटन,निंयत्रण, संदेशवहन, प्रशासन निर्माण करणारे, भारताचा वैधानिक, औद्योगिक शैक्षणिक व आरोग्य विषयक, मूल्य विषयक सर्वांगीण विकास गतिमान करणारे, भारताला सर्वार्थाने स्वावलंबी बनविणारे, देशातील कुपोषण, दारिद्र्य शोषण, विषमता नाहीशी करणारे, रोजगार निर्मिती करून भारत देश संपूर्ण जगात एक विकसित देश बनविणाऱ्या महान संविधानाचे थोर शिल्पकार म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
हिराकुड, दामोदर व सोन नदीवरील प्रकल्प या मुख्य भारतातील धरणांची पायाभरणी करणारे, इ.स १९४५ रोजी केंद्रीय जल आयोगाची स्थापना करणारे थोर जलतज्ञ, भारताच्या वीज निर्मिती मध्ये भरीव योगदान देऊन केंद्रीय वीज प्राधिकरणाची स्थापना करणारे, अखिल भारतीय ग्रीड व्यवस्थेची उभारणी करणारे महान विद्वान म्हणजे डाॅ बाबासाहेब आंबेडकर होय.


इ.स १९१८ रोजी ‘स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज’ हे शेती समस्या वरील मार्गदर्शक पुस्तके लिहिणारे आधुनिक शेतीपद्धतीचे पुरस्कर्ते, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते, खोती प्रथे विरोधात १० जानेवारी १९३८ रोजी २० हजार शेतकऱ्यांचा विधीमंडळावर मोर्चा काढणारे, देशात कुळ कायदा अस्तित्वात आणणारे थोर शेतीतज्ञ म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथातून भारताच्या आर्थिक व्यवस्थे संबंधित मुलगामी चिंतन करणारे व या ग्रंथाच्या तत्त्वज्ञानातून देशातील भारतीय रिझर्व बँकेची उभारणी करणारे, अर्थशात्रात परदेशात डाॅक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय व थोर अर्थतज्ञ. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देशात शिक्षणाचा प्रसार करणारे, सर्वांना शिक्षणाचा मूलभूत हक्क कायद्याने बहाल करणारे थोर शिक्षणतज्ञ म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.


आपल्या लेखणीतून देशातील वंचित, शोषितांचा आवाज बुलंद करणारे, जनता, मूकनायक, समता, बहिष्कृत भारत, या वृत्तपत्राचें संपादक, थोर पत्रकार. एकूण ३२ ग्रंथ, १० शोधनिबंध, १० निवेदने एवढ्या मोठ्या ग्रंथ संग्रहाचे थोर लेखक, जगातील, मराठी, संस्कृत,पाली, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी,जर्मनी, गुजराती, बंगाली, तमिळ, कन्नड, फारसी अशा अनेक भाषा जाणारे थोर बुद्धिवंत. जगातील एकूण सर्वाधिक ३२ पदव्या प्राप्त करणारे महान विद्वान, कोलंबिया विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचे नाव असलेले महान विद्यार्थी, युनेस्कोच्या मुख्यालयात २६ नोव्हेंबर या संविधान दिनी पुतळ्याचे अनावरण झालेले एकमेव भारतीय म्हणजे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.


जगातील १५२ देशांमध्ये ज्यांची जयंती साजरी होते असे एकमेव महापुरुष, संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालय जयंती साजरी होणारे एकमेव युगपुरुष. जगातील एक महान तर्कशास्त्रज्ञ व कायदे पंडित. ज्यांच्या शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो असे आदर्श विद्यार्थी (७ नोव्हेंबर १९००), स्त्रियांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी संसदेत हिंदू कोड बिल मांडणारे, स्त्रियांना मतदान, शिक्षण समान वेतनाचा, आरक्षणाचा, भर पगारी प्रसुती रजा मिळवून देणारे स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते. राजगृहात स्वतः हजारो पुस्तकांचे ग्रंथालय उभे करणारे जगातील एकमेव ग्रंथ प्रेमी म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
देशातील कामगारांना बारा तासां ऐवजी आठ तास कामाचा कायदा करणारे, कामगारांना बोनस, ग्रॅज्युटी, पेन्शन कायद्याने बहाल करणारे कामगारांचे नेते. इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालानुसार जगातील पहिल्या प्रतिभावान व्यक्तीमध्ये अव्वल स्थान मिळवणारे थोर प्रज्ञावंत. भारतात सर्वाधिक पुतळे असणारे महापुरुष.


अमेरिकेतील मेरीलँड राज्यात ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ या नावाने ओळखला जाणारा पुतळा असणारे महान विद्वान. चवदार तळ्याच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी जगातील एकमेव सत्याग्रह करणारे थोर सत्याग्रही म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
तसेच पाश्चिमात्य देशात चॅम्पियन ऑफ ह्युमन राईटस् या नावाने ओळखले जाणारे, अमेरिकेकडून फाऊंडीग फादर आँफ इंडिया ही पदवी मिळालेले, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात पुतळाअसणारे, कॅनडाच्या याॅर्क युनिवर्सिटी ज्यांच्या ज्ञानाचा व विचारांचा प्रभाव पडला आहे असे बहुगुणी आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होय.
अशा अनेक कर्तुत्वाने सजलेले, नावाजलेले बाबासाहेबांचे जीवन, व्यक्तिमत्व, कर्तुत्व राष्ट्राच्या व अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिले जावे अशा महान योग्यतेचे आहे. कारण आपल्या असामान्य व अलौकिक आणि आदरणीय गुणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कुठल्याही सुज्ञ व जिज्ञासू व्यक्तीच्या चिंतनाचा, मननाचा ,आदराचा, लेखनाचा विषय होत आहे, हे आवर्जून समजून घ्यावी ही वास्तविकता आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार डॉ. ज्ञानराज गायकवाड लिहितात एक महत्त्वकांक्षी, लक्षवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी ,धाडसी ,कष्टाळू, अभ्यास, विचारी,स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा उपयोग करणारे लोकहितदक्ष महानायक,थोर सत्याग्रही, झुंझार जन आंदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू मानवतेचा मित्र, भारत राष्ट्र सर्व दृष्टीने समर्थ होण्यासाठी संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते, ज्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरावे अशा महान योग्यतेचे, आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अशा थोर महामानवाला १३५ व्या जयंती निमित्य त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐🙏
(श्री.जी.डी.कांबळे. आजरा हायस्कूल)

Tags: Gopal Gadkari
Previous Post

शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

Next Post

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यात निर्धार मेळावा

Related Posts

लेख

अधिक मासामुळे लग्नसराईला ब्रेक; आता थेट २०२७ मध्येच शुभमुहूर्त

May 15, 2026
33
लेख

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

May 13, 2026
720
लेख

आई… हा शब्द उच्चारला तरी मायेचा, त्यागाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा अनुभव येतो…

May 11, 2026
8
मला भेटलेली अनामिका…!

मला भेटलेली अनामिका…!

March 8, 2026
23
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
47
घणसोलीतील रुपश्री विद्यालयात मराठी दिनाचा जल्लोष
Blog

घणसोलीतील रुपश्री विद्यालयात मराठी दिनाचा जल्लोष

February 27, 2026
805
Next Post

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यात निर्धार मेळावा

ताज्या बातम्या

खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

May 31, 2026

वर्धा शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांत तीन मकोका कारवाया

May 31, 2026
कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

May 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In