• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 13, 2026
in Blog
0
शिक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट?
0
SHARES
304
VIEWS
Ad 1

उमरखेड तालुक्यातील खासगी शिक्षण संस्थांविरोधात संतापाचा उद्रेक

“प्रवेश फी, विकास निधी, उपक्रम शुल्काच्या नावाखाली पालकांची सर्रास पिळवणूक”; कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी :

उमरखेड :
उमरखेड तालुक्यातील अनेक खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित आर्थिक लुटीविरोधात आता संताप उफाळून आला असून, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे आक्रमक भूमिका घेत कठोर चौकशीची मागणी केली आहे.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

शासनाच्या नियमांना पायदळी तुडवत प्रवेश फी, विकास निधी, उपक्रम शुल्क, इमारत निधी, परीक्षा शुल्क अशा विविध नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड येथे निवेदन देण्यात आले असून तहसीलदार तसेच गटशिक्षण अधिकारी, उमरखेड यांनाही निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संजय वाघमारे, प्रवीण इंगळे, बबलू उर्फ मोहम्मद शेख आणि स्वरांजली वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विविध योजनांमधून विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या शिक्षणाची तरतूद असतानाही अनेक खासगी संस्था नियमबाह्य शुल्क आकारून पालकांना आर्थिकदृष्ट्या वेठीस धरत आहेत. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मुलांचे शिक्षण परवडेनासे झाले असून, अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे, शिक्षण क्षेत्रात काही दलाल आणि संस्थाचालकांनी शिक्षणाला व्यवसायाचे स्वरूप दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “शिक्षण हे समाज घडविण्याचे साधन नसून पैसा कमावण्याचा धंदा बनला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

गोरगरिबांच्या लेकरांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाने कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

  • उमरखेड तालुक्यातील सर्व खासगी शाळा व महाविद्यालयांची विशेष चौकशी करण्यात यावी.
  • विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या सर्व शुल्कांचा लेखाजोखा तपासण्यात यावा.
  • शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • बेकायदेशीर शुल्क आकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी.
  • शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करण्यात यावी.

दरम्यान, पालकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असून, “शिक्षण माफियांना प्रशासनाचे अभय आहे का?” असा सवालही उपस्थित होत आहे. तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Previous Post

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

Next Post

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
22
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
82
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

पत्रकारांना धमकावणे आता पडणार महागात; ‘पत्रकार संरक्षण कायद्या’चा बडगा, आरोपींना थेट कोठडी!

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In