• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
बस थांबा नावालाच; झाडाच्या सावलीचा प्रवाशांना आधार
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड :
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील जुने एसटी स्टँडजवळ पवित्रा हॉटेलसमोरील बस थांब्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना झाडाच्या सावलीत उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सदर बस थांब्याचे उद्घाटन तत्कालीन आमदारांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र सुरुवातीपासूनच हा बस थांबा अपूर्ण अवस्थेत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. नवीन आणि सुसज्ज बस थांबा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज हा थांबा पूर्णपणे मोडकळीस आला आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

बस थांब्यावर बसण्यासाठी बाकडे किंवा खुर्च्यांची कोणतीही सुविधा नसल्याने प्रवासी तेथे थांबतच नाहीत. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढला असून तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नागरिक झाडांच्या सावलीत उभे राहून एसटीची वाट पाहताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी एसटी हेच एकमेव परवडणारे प्रवासाचे साधन मानले जाते. मात्र बसस्थानकात बसचे योग्य नियोजन नसल्याने बस वेळेवर येत नाहीत. परिणामी प्रवाशांना दीर्घकाळ उभे राहावे लागते. काही वेळाने कंटाळून प्रवासी रस्त्यावरच बसून राहतात. त्यातच अरुंद रस्ता आणि अतिक्रमण केलेली वाहने यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे नवीन व सुसज्ज बस थांबा उभारण्याची मागणी केली आहे. कुरुंदवाडच्या तुलनेत कोल्हापूर, जयसिंगपूर आणि नरसोबाची वाडी येथील बस थांबे अधिक चांगल्या सुविधांनी सुसज्ज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी स्वतः कुरुंदवाडला भेट देऊन येथील परिस्थिती पाहावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बस थांबे आणि बसस्थानक अद्ययावत करावे, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Previous Post

पोस्ट ऑफिसची टपाल पेटी असून नसल्यासारखी; दुर्लक्षामुळे अस्तित्व धोक्यात

Next Post

शिक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट?

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
8
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
शिक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट?

शिक्षणाच्या नावाखाली गोरगरिबांची आर्थिक लूट?

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In