• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in Blog
0
पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

शहादा, दि.12 (का.प्र.)
शाळा आणि महाविद्यालयांना जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाल्याने पुणे-मुंबईकडे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तसेच रोजगारासाठी स्थायिक झालेली कुटुंबे आता आपल्या मूळ गावी परतू लागली आहेत. मात्र, प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाड्यात मोठी वाढ करून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईचा हंगाम साधून सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

सध्या राज्यभर उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असून, शहादा तालुक्यातील अनेक कुटुंबे रोजगार आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत वास्तव्यास आहेत. सुट्ट्यांमुळे ही कुटुंबे गावाकडे परतत असताना खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.

एरवी शहादा ते पुणे किंवा मुंबई प्रवासासाठी ६०० ते ८०० रुपये भाडे आकारले जात असताना, सध्या प्रवाशांकडून १४०० ते २००० रुपयांपर्यंत भाडे घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, तिकीट मिळवण्यासाठी अनेक दिवस आधी बुकिंग करावे लागत असून, “गाड्या फुल्ल आहेत”, “मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत”, “उद्या दर आणखी वाढतील” अशा कारणांनी भीतीचे वातावरण निर्माण करून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत.

शहादा शहरातून पुण्यासाठी दररोज सुमारे १२ तर मुंबईसाठी ४ खासगी बसेसची ये-जा होत असते. मात्र, सर्वच ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून वाढीव दर आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना अनेक प्रवाशांनी सांगितले की, “उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे आम्ही गावाकडे निघालो आहोत. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन सहकार्य करण्याऐवजी ट्रॅव्हल्स चालकांकडून दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात आहे. ही सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक लूट आहे.”

दरम्यान, पुणे येथील ॲड. जगदीश सोनवणे यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त करत, “उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे अनेक कुटुंबे गावी परतत आहेत. या संधीचा फायदा घेऊन नियमबाह्य भाडेवाढ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” अशी मागणी केली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

माळशिरस तालुक्याच्या दुष्काळमुक्तीसाठी ११ हजार सह्यांची मोहीम

Next Post

शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post
शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In