• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा-मंदाणे रस्त्यावर पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शहादा, दि.12 (का.प्र.)
शहादा ते मंदाणे मार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवळीथ येथील ५३ वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वीच कवळीथ गावातील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावण पाटील हे शहादा येथे काम आटोपून दुचाकी क्रमांक एमएच १८ टी ५१२२ ने दुपारी सुमारे १२ वाजता आपल्या कवळीथ गावाकडे परतत होते. यावेळी डोंगरगावजवळील खडी मशीनसमोर केळी भरून शहादाकडे येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक एमएच ३९ एडी २४११ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून वाहनाचे चाकही निखळून दूर जाऊन पडले. या भीषण अपघातात रावण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच रस्त्यावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मृत रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात गावातील दोन व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कवळीथ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, शहादा-मंदाणे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असतानाही सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“अजून किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

पुणे-मुंबईहून येणाऱ्या कुटुंबांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून लूट

Next Post

युवाशक्तीला दिशा देण्यासाठी २१ मे रोजी श्रीखेड येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठक

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
167
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
81
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

युवाशक्तीला दिशा देण्यासाठी २१ मे रोजी श्रीखेड येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठक

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In