• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पदपथावरच अनधिकृत गोठा; पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील आझाद नगर, सॅन्डोझ बाग परिसरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर चक्क अनधिकृत गोठा उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अतिक्रमणामुळे पदपथ पूर्णपणे बंद झाला असून पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना नाईलाजाने वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

आझादनगर येथील ‘रिजन्सी बिझनेस पार्क’ समोर बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने हा गोठा उभारण्यात आला आहे. पदपथावर जनावरे बांधल्यामुळे परिसरात शेण, मूत्र आणि उरलेला चारा साचून राहतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत जनावरे बांधणे हे जनावरांसाठीही धोकादायक आहे. एखादे जनावर अचानक बिथरून रस्त्यावर आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर समस्येबाबत जागरूक नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

नागरिकांनी पदपथावरील हा अनधिकृत गोठा तातडीने हटवून परिसर अतिक्रमणमुक्त करावा, जनावरांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी तसेच आरोग्याचा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून त्वरित स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने संयुक्त कारवाई करून या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Tags: Vinod Jagtap
Previous Post

पालखी मार्ग पाहणी दौऱ्यात घुलेनगर येथील ऐतिहासिक विहिरीची पाहणी

Next Post

आमदार संजना जाधव यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाला सदिच्छा भेट

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
आमदार संजना जाधव यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाला सदिच्छा भेट

आमदार संजना जाधव यांच्याकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाला सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In